Advertisement

पराभवाची चव चाखलेले संजय दिना पाटील राखतील का राष्ट्रवादीचा मान?


पराभवाची चव चाखलेले संजय दिना पाटील राखतील का राष्ट्रवादीचा मान?
SHARES

संजय दिना पाटील यांना काँग्रेसकडून ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव करत ही जागा भाजपाकडे खेचून आणली होती. परंतु यावेळी भाजपानं किरिट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात गुजराती मतदारांचं प्रमाणही जास्त असून तो भाजपाचा मतदार मानला जातो. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्यासाठी ही निवडणुकीच अटीतटीची ठरण्याची शक्यता आहे.

२.६० कोटींची संपत्ती
संजय दिना पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे संध्या २.६० कोटी रूपयांची संपत्ती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीत ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्यकडे १.९९ कोटींची संपत्ती होती.

राजकीय कारकीर्द
२००९ मध्ये संजय दिना पाटील यांनी उत्तर पूर्व मुंबईतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा पराभव केला होता. परंतु २०१४ साली मोदी लाटेत किरीट सोमय्या यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी परिस्थिती वेगळी असली तरी त्यांना मनोज कोटक यांच्याशी सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी गुजराती मतदारांप्रमाणंच मराठी भाषिक मतदारांची संख्यादेखील अधिक आहे. या मतदारसंघातील काही मतदार हा भाजपचा पारंपारिक मतदार मानला जातो. त्यामुळे या ठिकाणच्या निकालाबद्दल भाकीत करणं अशक्य आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा