Advertisement

मुकेश अंबानींच समर्थन मिळालेले मिलिंद देवरा ठरतील का मतदारांचे योग्य उमेदवार?


मुकेश अंबानींच समर्थन मिळालेले मिलिंद देवरा ठरतील का मतदारांचे योग्य उमेदवार?
SHARES

मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत. दक्षिण मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर २००९ साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता. मनसेमुळे मराठी मतांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा त्यांना त्यावेळी फायदा झाला होता. त्यानंतर २०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी त्यांच्यापुढं शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांचं आव्हान असणार आहे.

मतदारसंघाचा इतिहास
काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा हे १९८० सालीच्या पोट निवडणुकीत पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. पुढे १९८९ आणि १९९१ अशा दोन्ही लोकसभेच्या निवडणुका देवरा यांनी जिंकल्या. त्यानंतर मात्र १९९६ मध्ये देवरा यांना भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी हरवलं.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत मुरली देवरा यांनी मिलिंद यांना निवडणुकीत उतरवलं. या मतदारसंघातून पुढे मिलिंदसलग १० वर्षे खासदार राहिले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी १ लाख २८ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

मिलिंद देवरांचा प्रवास
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलं आहे. वडिलांच्या पराभावानंतर २००४ मध्ये मिलिंद देवरा हे पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर जयंतीबेन मेहता यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत १० हजार मतांच्या फरकाने देवरा निवडून आले. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर केंद्रीय नागरी विकासमंत्री पदाची जबाबदारी सोपावली. त्यावेळी मतदार संघासह त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले.  

पक्षाने २००९ च्या निवडणुकीत पुन्हा देवरा यांना उमेदवारी दिली. त्यावेळी देवरा यांनी विरोधकांचा १ लाख १२ हजार ६८२ मताधिक्याने पराभव केला. तसंच संसदेत त्यांची ८८% उपस्थिती होती. तर २७४ चर्चासत्रामध्ये त्यांनी भाग घेत प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे राहुल गांधीच्या विश्वासू साथीदारांपैकी ते एक असल्यामुळे पक्षाची बाजू सावरण्यासाठी नुकतीच त्यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गटबाजीचा फटका
मुंबईत २०१४ च्या निवडणुकीत मतदारसंघाच्या फेरबदलामुळे हा मतदारसंघ शिवडीपर्यंत वाढला. त्यातच काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोडांवर संजय निरूपम, कृपाशंकर सिंग, गुरूदास कामत , मिलिंद देवरा हे चार गट तयार झाले. तळागाळातील नेत्यांशी देवरा यांचा संपर्क कमी झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्तेही देवरा यांच्यावर नाराज होते. एकमेकांमध्ये मेळ नसल्यामुळे या मतदारसंघात देवरा यांचा जोर ओसरला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी देवरा यांचा १ लाख २८ हजार मताधिक्याने पराभव केला.


#MLviews

निवडणूक जाहीर होण्याआधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार नसलेल्या देवरा यांच्यावर दुहेरी जबाबदारी येऊन ठेपलीय. ती म्हणजे दक्षिण मुंबईचा गड पुन्हा ताब्यात घेणे आणि मुंबईतील इतर उमेदवारांनाही सपोर्ट करणे. मुंबईत राष्ट्रवादीचा म्हणावा तसा जोर नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावरच त्यांना भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांना लढत द्यायची आहे. या कामगिरीत ते यशस्वी ठरतील की नाही हे निवडणुकीनंतरच ठरेल. 



हेही वाचा-

भाजपातून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना मतदार देणार का साथ?

शिवसेनेचा गड असणाऱ्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसोपा?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा