Advertisement

भाजपातून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना मतदार देणार का साथ?


भाजपातून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना मतदार देणार का साथ?
SHARES

पालघर जिल्ह्याच्या विभाजनापासून जिल्हातील समस्या सोडवण्यात चिंतामण वनगा यांचा महत्त्वाचा वाटा होता. २०१४ मध्ये मोदी लाटेव्यतिरिक्त आपल्या कामाच्या जोरावर ते भाजपाकडून लोकसभेत निवडून गेले. त्यातच पालघर (वसई-विरार) क्षेत्रात प्राबल्य असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं आव्हान सहजरित्या पेलत बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांचा त्यांनी ३ लाख मतांनी पराभव केला. परंतु २०१८ साली त्यांच्या आकस्मिक निधनानंतर पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवत ही जागा भाजपाकडंच ठेवली.

२० हजार मतांनी विजय
२०१८ साली पालघर लोकसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी अवघ्या २० हजार मतांनी विजय मिळवला होता. चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी देत गावित यांना कडवी टक्कर दिली. २०१४ मध्ये राजेंद्र गावित यांनी काँग्रेसकडून आपला अर्ज दाखल केला होता. परंतु ऐनवेळी काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेत बविआला पाठिंबा दिल्यामुळं त्यांची चांगलीच कोंडी झाली होती. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा बहुजन विकास आघाडीकडे होती.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपात 
२०१८ साली राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपानंही त्यांना उमेदवारी देत त्यांच्या विजयासाठी भाजपानं मोठी टीम उभी केली होती. आघाडी सरकारच्या काळात गावित यांनी काँग्रेसकडून विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांच्याकडं आदिवासी विकासमंत्री पद देण्यात आलं होतं.

शिवसेनेत प्रवेश
शिवसेना-भाजपा युतीच्या लोकसभेच्या जागा वाटपानंतर पालघर लोकसभेची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली. यापूर्वी शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश केला आणि पालघर लोकसभेसाठी गावित यांना उमेदवारी देण्यात आली.

८ कोटींची संपत्ती
२०१८ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गावित यांच्याकडे एकून ८ कोटी ७७ हजारांती संपत्ती होती. २०१६ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान त्यांच्याकडं ६ कोटी ५३ लाखांची संपत्ती होती. केवळ २ वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही पदाशिवाय त्यांची संपत्ती २ कोटींनी कशी वाढली? याची बरीच चर्चा रंगली होती.


#MLviews

राजेंद्र गावित यांना पक्ष उड्यांमुळे त्यांनी आपलं महत्त्व कमी करून घेतलं आहे. वनगा यांना बाजूला सारून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं त्यांना शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्याही नाराजीला सामोरं जावं लागणार आहे. तर समोर बहुजन विकास आघाडीलाही सर्वांचा सपोर्ट मिळाल्यामुळं ही निवडणूक अतितटीची होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा