Advertisement

बळीराम जाधव बविआचा गड मिळवून देणार का?


बळीराम जाधव बविआचा गड मिळवून देणार का?
SHARES

बहुजन विकास आघाडीतर्फे यावेळी बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बळीराम जाधव हे बविआचे ज्येष्ठ नेते मानले जातात. २००९ साली झालेल्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत बळीराम जाधव पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. परंतु २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर पोटनिवडणुकीतही त्यांनी अर्ज भरला. परंतु त्यावेळीही त्यांना अवघ्या काही हजार मतांनी भाजपच्या राजेंद्र गावित यांनी त्यांचा पराभव केला होता.

पहिला विजय
२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव यांनी २ लाख २३ हजार २३४ मतांनी विजय मिळवला होता. तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपाच्या चिंतामण वनगा यांना २ लाख १० हजार ८३४ मतं मिळाली होती. केवळ १२ हजार ३६० मतांनी जाधव यांनी वनगा यांचा पराभव केला होता.

२०१४ मध्ये पराभव
२०१४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव यांचा मोठा मताधिक्यानं पराभव झाला होता. भाजपाच्या चिंतामण वनगा यांनी त्यांचा २ लाख ३९ हजार ६३९ मतांनी पराभव केला. पालघर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि मोदी लाटेमुळे मोठ्या मताधिक्यानं जाधव यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१८ साली चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही बविआनं बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेने वेगळी निवडणूक लढण्याचा त्यांना फायदा झाला होता. त्यांना २ लाख २२ हजार ८३७ मतं मिळाली होती. काँग्रेस आणि माकपच्या उमेदवारांचा पाठिंबा नसल्याचा तोटा त्यांना सहन करावा लागला होता. यावेळी त्यांना माकप आणि काँग्रेसनं पाठिंबा दिल्यामुळं त्यांचं मताधिक्य कितीनं वाढेल किंवा कमी होईल हे लवकरच समोर येईल.

फौजदारी गुन्हे
त्यांच्या नावे केवळ ६० लाख २ हजार ११ रूपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ९ लाख ४८ हजार ७०५ रूपयांची जंगम मालमत्ता, तर १ कोटी ४ लाखांची त्यांची आणि २९ लाख २६ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. याव्यतिरिक्त त्यांच्यावर काही फौजदारी गुन्हेदेखील दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

विशेष काम
समाजातील गरीब आणि निर्धन घटकांना मदत करणं, तसंच महिला आणि बालकल्याणासाठी त्यांनी विशेष कार्य केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सैवन ग्रामपंचायतीचं १७ वर्ष सरपंचपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद, वसई कला क्रीडा महोत्सवाचं सदस्यपदही भूषवलं आहे.

#MLviews

 पोटनिवडणुकीत बळीराम जाधव यांना फार कमी फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. विक्रमगड, तलासरी यांसारख्या भागातून कमी मतदान झाल्यामुळं त्यांचा पराभव झाला होता. परंतु आता पालघर जिल्ह्यात काँग्रेस, माकपनं बविआला पाठिंबा दिल्यानं त्यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा