अधिवेशनात झाले 78 तास 24 मिनिटे कामकाज

 Mumbai
अधिवेशनात झाले 78 तास 24 मिनिटे कामकाज

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी 7 एप्रिलला संपले. यावेळी सभागृहात 78 तास 24 मिनिटे कामकाज झाले. याचवेळी 13 तास 39 मिनिट कामकाज झाले नाही. त्यामुळे रोज सरासरी कामकाज 3 तास 55 मिनिटेच झाले.

संपूर्ण अधिवेशन कालावधीत सभागृहात सदस्यांची एकूण उपस्थिती 76.30 टक्के इतकी होती. तर जास्तीत जास्त उपस्थिती 89.49 टक्के तर कमीत कमी उपस्थिती 50.58 टक्के इतकी होती. अधिवेशन काळात तारांकित प्रश्न 10,551 होते. यात स्वीकृत तारांकित प्रश्नाची संख्या 722 होती. सभागृहात 71 प्रश्नाची तोंडी उत्तरे देण्यात आली. अल्पसूचनाची संख्या 5 होती. यातील 1 अल्पसूचना स्वीकृत झाली.

एकूण प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचनांची संख्या 2,752 असून, स्वीकृत लक्षवेधी 88 इतक्या आहेत. मात्र फक्त 33 लक्षवेधींवर चर्चा झाली. विधानसभेत 28 विधेयके संमत केली आणि दोन्ही सभागृहांनी 11 विधेयके संमत केली. अर्धा तास चर्चेच्या एकूण 235 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 72 स्वीकृत करण्यात आल्या आणि सभागृहात 10 अर्धा तास चर्चेच्या सूचनांवर चर्चा झाली. नियम 293 अन्वये 02 प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. अंतिम आठवडा प्रस्तावावर मात्र चर्चा झाली नाही. दरम्यान, पावसाळी अधिवेशन 24 जुलैला सुरू होणार आहे.

Loading Comments