Advertisement

राज्य सरकारची धरसोड वृत्ती व धोरणाच्या अभावामुळं नागरिकांचे हाल- केशव उपाध्ये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

राज्य सरकारची धरसोड वृत्ती व धोरणाच्या अभावामुळं नागरिकांचे हाल- केशव उपाध्ये
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल (mumbai local) प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. खाजगी वाहनानी प्रवास करणं परवडत नसल्यानं लवकरात लवकर लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय, अनेक नेते मंडळी देखील लोकलप्रवासासाठी पुढाकार घेत आहेत. अशातच सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने २ आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची धरसोड वृत्ती आणि धोरणाच्या अभावामुळं मुंबई आणि उपनगरासह महानगर क्षेत्रातील नागरिकांना अतोनात हाल सोसावे लागत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

भाजप कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर (state government) टीका केली. भाजप मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या प्रश्नावर आक्रमक आहे. मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील, असा इशारा उपाध्ये यांनी यावेळी दिला. मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडं धोरण नसल्यानं सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

केंद्रानं २ आठवड्यांपूर्वीच सर्वांसाठी लोकल सुरू करण्यास अनुकूलता दाखविली आहे. मात्र, राज्य सरकारकडून सामान्य जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. लॉकडाऊनबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळं जनतेचं जगणं अगोदरच मुश्कील झालं आहे. त्यामुळं एकतर प्रवासाची मुभा द्या किंवा प्रवास खर्चापोटी ५  हजार रुपयांचा भत्ता द्या, अशी भाजपची भूमिका आहे. लोकल अभावी वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ २ ऑगस्टपासून मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युंबाबत मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी नेत्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. मात्र, राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांचा खोटेपणा न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्राने उघड झाल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.




हेही वाचा -

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा