राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंगला ऊत

मुंबई - राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊट गोईंग हे काही नवीन नाही. त्यातच आता मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आली आणि याचं प्रमाणही वाढलं. नुकतंच राष्ट्रावादीच्या नगसेविका संध्या दोशी यांनी हातातलं घड्याळ सोडून शिबबंधन बांधनं पसंत केलंय. तर शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर, कामगार नेते सुनील गणाचार्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलीय. इनकमिंग फक्त भाजापा-शिवेसेनेतच होतं असं नाहीतर काँग्रेमध्येही आयारामांचं प्रमाण वाढल्याचा दावा काँग्रेस नेते करतायेत.

Loading Comments