Advertisement

तर, लाॅकडाऊन हा एकच मार्ग, उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा

सर्व प्रकारे प्रयत्न करूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास पुन्हा लाॅकडाऊन करणं हा एकच मार्ग समोर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तर, लाॅकडाऊन हा एकच मार्ग, उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा
SHARES

राज्यात कोरोनाचा (coronavirus) संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. सर्व प्रकारे प्रयत्न करूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास पुन्हा लाॅकडाऊन करणं हा एकच मार्ग समोर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या आपण जवळपास किंवा पुढे आहोत. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन करणं हा एकच मार्ग आहे. मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत. नाहीतर, लॉकडाऊनचा पर्याय समोर दिसत आहे, असं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी यावेळी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता विषाणू हा नव्या स्ट्रेनचाच आहे का याबाबत अद्याप आपल्याला माहिती मिळालेली नाही. केंद्राकडून तशी माहिती वेळेत येणं अपेक्षित आहे.

हेही वाचा- आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

दरम्यान, महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसंच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावं, असंही या आदेशात म्हटलं आहे.

त्याचसोबत नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थितीदेखील ५० टक्के असावी. तसंच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

(lockdown is last option to stop coronavirus spread says maharashtra cm uddhav thackeray)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा