Advertisement

मुंबईच्या ‘मत’टक्क्यात वाढ; ३० वर्षातलं सर्वाधिक मतदान

सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. खरं तर या टप्प्यात सर्वांच लक्ष लागलं होतं ते मुंबईतील मतदानाकडे. यापूर्वीच्या टप्प्यात पुण्यात मतदान पार पडलं होतं.

मुंबईच्या ‘मत’टक्क्यात वाढ; ३० वर्षातलं सर्वाधिक मतदान
SHARES

सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. खरं तर या टप्प्यात सर्वांच लक्ष लागलं होतं ते मुंबईतील मतदानाकडे. यापूर्वीच्या टप्प्यात पुण्यात मतदान पार पडलं होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी मतदानात पुणेकर अव्वल ठरतात का मुंबईकर? हा प्रश्न विचारला जात होता. मुंबईकरांनी याला मतदानातून उत्तर देत आपणच अव्वल ठरल्याचं दाखवून दिलं.


३० वर्षातील सर्वाधिक मतदान

लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे शहरात ४९.८४ टक्के मतदान झालं होतं. परंतु मुंबईत झालेल्या झालेल्या मतदानानं पुण्याचा रेकॉर्ड मात्र तोडला. वाढलेली उष्णता, उकाडा अशा गोष्टींनाही बगल देत मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये ५४.३० टक्के मतदान झालं. गेल्या वेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत ५१.५९ टक्के मतदान झालं होतं. यावेळी झालेल्या मतदानाचा विचार केला तर गेल्या ३० वर्षांमध्ये झालेलं सर्वाधिक मतदान आहे.

मतदारांमधील उत्साह

मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पहायला मिळत होता. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानासाठी अनेक मतदार तासनतास रांगेत उभे राहिल्याचे पहायला मिळत होते. त्यानंतर तापमानाचा पारा वाढल्यानंतर मतदारांची संख्या कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तसं झालेलं दिसलं नाही. दुपारी १ ते ३ च्या दरम्यानही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. कांदिवली, अंधेरी, बोरीवली, विलेपार्ले अशा अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येत होतं. यावेळी निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ वाढवल्यामुळं संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार होतं. त्यामुळे ऊन ओसरल्यानंतर पुन्हा मतदार केंद्रांवर रांगा पहायला मिळाल्या होत्या.




हेही वाचा -

तब्बल १६०० स्थलांतरीत प्रकस्पग्रस्त मतदानापासून वंचित



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा