SHARE

 भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळेच मी लोकसभा अध्यक्ष झालो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अाणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अापल्या भावना व्यक्त केल्या.


एका सभेत भेट

एका खाजगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोशी यांनी म्हटलं की, अटलबिहारी वाजपेयी यांची माझी भेट मुंबईतील एका सभेत झाली. त्यावेळी मी बाळासाहेबांसोबत सभेला गेलो होतो. मला कधीही वाटलं नव्हतं की मी लोकसभा अध्यक्ष होईल.  पण भाजपा आणि वाजपेयींनी लोकसभा अध्यक्षाबाबतची भूमिका कायम ठेवल्याने मी लोकसभा अध्यक्ष झालो. राज्याचा मुख्यमंत्री झालो त्यावेळेसही भाजपाने पूर्ण सहकार्य केलं. यात देखील अटलबिहारी वाजपेयी यांचं योगदान खूप मोठं आहे.

बाळासाहेबांंशी चांगले संबंध

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांचे संबंध चांगले होते. विनोदी गप्पा ऐकाव्या तर त्यांच्या सोबत बसावे. त्या दोघांनी परस्परांना समजून घेतले होते म्हणून दोन्ही पक्षांनीही एकमेकांसोबत पटवून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्मृती खासदार आणि जनतेपर्यंत पोहचवण्याच्या माझ्या कल्पनेला अटलजींनी पाठिंबा दिला. त्यामुळे अाज अापल्याला संसदेच्या सभागृहात या महापुरूषांची तैलचित्रं पहायला मिळतात. अटल बिहारी वाजपेयी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

वाजपेयी यांची 'ही' ७ तडफदार भाषणं बघून तुम्हालाही जोश येईल!

'या' आहेत वाजपेयी यांच्या अजरामर कविता

संबंधित विषय
ताज्या बातम्या