महाराष्ट्रात जदयु नवा पर्याय - कपिल पाटील

  Prabhadevi
  महाराष्ट्रात जदयु नवा पर्याय - कपिल पाटील
  मुंबई  -  

  प्रभादेवी - महाराष्ट्रातील जनतेला जदयु हा नवा पर्याय असेल अशी प्रतिक्रिया आमदार कपिल पाटील यांनी दिली. आमदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील 'लोकभारती' या पक्षाचे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड पक्षात विलीनीकरण करण्यात आले. लोकभारतीच्या औपचारीक बैठकीत विलीनीकरणाचा ठराव मांडण्यात आला.

  राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सवतीचं भांडण असून, त्यांची वैचारिक दृष्टी वेगळी आहे. एक खोटं दहा वेळा बोललं की ते खरं वाटायला लागतं, या विचारसरणीचे हे लोक आहेत. महाराष्ट्रात त्या विरोधात जनता दल युनायटेड सक्षम राजकीय पर्याय उभा करेल असा विश्वास जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव श्याम रजक यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी आमदार कपिल पाटील यांची महाराष्ट्र जदयुच्या संयोजकपदी नेमणूक केल्याचं श्याम रजक यांनी जाहीर केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.