नशिबाने दिली भाजपाला साथ

Mumbai  -  

मुंबई सेंट्रल -  मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले मात्र एक जागा अशी होती की जिच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून होत्या. याचं कारण होतं 13 व्या फेरीपर्यंत रंगलेल्या फेरमोजणीत भाजपाच्या अतूल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना मिळालेली समान मतं.

या दोघांमध्ये टाय झाल्यानं अखेर इश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. या चिमुरडीच्या हाताने काढण्यात येणाऱ्या चिठ्ठीने या दोघांचही भविष्य ठरणार होतं. मात्र काढण्यात आलेली चिठ्ठी अतूल शहा यांच्या नावाची असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला.

शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या या निकालाने भाजपाच्या बाजूने कौल देत शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना धक्का दिला. चिठ्ठीने का होईना भाजपाची एक जागा वाढली असं म्हणायला हरकत नाही.

Loading Comments