हाय अलर्टमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं

अधिवेशन काळात विधानभवनाच्या सुरक्षेसाठी ५००० पोलिस तैनात होते. तर विधानभवनाच्या सुरक्षेशिवाय १५०० आणखी पोलिस अधिवेशनकाळात येणाऱ्या मोर्चांना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते.

SHARE

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यानं राज्यासह मुंबईला देखील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संपुष्टात आणण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन  २ मार्चला संपणार होतं. मात्र, अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करावे लागतात. त्यामुळं ल सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण वाढू नये आणि अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध व्हावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्ठात आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत स्पष्ट केले. तसंच हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले.


सर्वानुमते मंजुरी

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण येतो. भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्य वस्थेत वाढ व्हावी यासाठी पोलीस विभागाशी चर्चा करण्यात आली. अधिवेशन संपुष्ठात आणल्यास पोलिसांना अधिक बळ उपलब्ध होईल. बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपलब्ध होते. तसंच, गुरुवारी विरोधी पक्षांचे नेते आणि गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमत्र्यांनी सभागृहात दिली.

 

५००० पोलिस तैनात 

अधिवेशन काळात विधानभवनाच्या सुरक्षेसाठी ५००० पोलिस तैनात होते. तर विधानभवनाच्या सुरक्षेशिवाय १५०० आणखी पोलिस अधिवेशनकाळात येणाऱ्या मोर्चांना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. अधिवेशन संपवण्यात आल्याने इतका मोठा अतिरिक्त पोलिस फोजफाटा मुंबईत बंदोबस्तासाठी उपलब्ध होईल. हेही वाचा -

सिनेमा पहा आणि नवाजुद्दीनसोबत फोटो काढा!

बेस्टच्या ताफ्यात येणार २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या