Advertisement

राज्यातील 'बर्ड फ्लू' नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार!

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.

राज्यातील 'बर्ड फ्लू' नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार!
SHARES

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी दिली. सोबतच राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको‌, काळजी घ्या, असं आवाहन देखील केदार यांनी केलं.

यासंदर्भात अधिक माहिती देताना पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने ८ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, ८ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, ६ आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, ६ आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, ६ आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि ६ आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचं सुनील केदार यांनी सांगितलं.

हेही वाचा- राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌!

कुक्कुट पक्षांचे मांस व अडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेलं कोबड्यांचं मांस आणि उकडलेली अंडी खाणं सुरक्षित आहे. पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसंच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणं दिलं जातं. अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. महाराष्ट्रातील (maharashtra) जिल्हा तसंच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. 

कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणं आवश्यक आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहनही सुनील केदार (sunil kedar) यांनी केलं आहे.

(maharashtra animal husbandry minister sunil kedar announces compensation for bird flu affected poultry farm)

हेही वाचा- ‘बर्ड फ्लू’ माणसांना होऊ शकतो का?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा