Advertisement

भाजपला घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही- शरद पवार

मी अजूनही तरुण आहे. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपला घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही- शरद पवार
SHARES

मी अजूनही तरुण आहे. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.  

सैनिकांचा वापर

अकोला जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना पवार म्हणाले, ‘ हे सरकार सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलं आहे. नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी हे मुद्देसुद्धा सर्वसामान्यांची फसवणूक करणारे ठरले. म्हणूनच आपलं अपशय लपवण्यासाठी या सरकारने सैनिकांचा वापर सुरू केला. इंदिरा गांधीं यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकूनदेखील त्याचं श्रेय कधी घेतलं नव्हतं. राज्यातील ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवं,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

अजूनही तरूण

मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. सर्वसामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, असं पवार म्हणाले.

 


हेही वाचा-

राष्ट्रवादी नाही, तर शिंदे स्वत:च थकलेत- अजित पवार

विलिनीकरण? शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेना दिलं सणसणीत उत्तरसंबंधित विषय
Advertisement