Advertisement

गडकरींची मध्यस्ती फळणार?

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केली जाणारी मध्यस्ती फळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गडकरींची मध्यस्ती फळणार?
SHARES

‘अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देत असाल तरच चर्चा’, असं शिवसेनेकडून सातत्याने ठणकावून सांगितलं जात असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केली जाणारी मध्यस्ती फळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

विद्यमान १३ वी विधानसभा संस्थगित होण्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्यस्तीची गरज भासल्यास आपण तयार असल्याचं सांगत गडकरी देखील दिल्लीतून मुंबईत दाखल झाले आहेत.

भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमत्रिपद घेण्याबाबत काही ठरलं नसल्याचं सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्यात सरकार बनेल, याचा पुनरुच्चारही गडकरी यांनी केला.

दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यातील पेच राज्यातील नेतेच सोडवतील, असं ते म्हणत असले, तरी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न गडकरी करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नितीन गडकरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधतील, असंही म्हटलं जात आहे.   



हेही वाचा-

फोडाफोडीचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी- मुनगंटीवार

देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा