Advertisement

‘या’ शिवसेना नेत्यांवर मोठी जबाबदारी

ऐन मोक्याच्या क्षणी राऊत रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणी करण्यासाठी शिवसेनेने चार नेत्यांवर जाबाबदारी सोपवली आहे.

‘या’ शिवसेना नेत्यांवर मोठी जबाबदारी
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना छातीत दुखत असल्यानं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐन मोक्याच्या क्षणी राऊत रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणी करण्यासाठी शिवसेनेने चार नेत्यांवर जाबाबदारी सोपवली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील निम्म्या वाट्यावरून हे शिवसेनेची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडत आहेत. गेल्या १५ दिवसात त्यांनी या मागणीवरुन भाजपाला चांगलंच हैराण केलं. त्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना राऊत रुग्णालायात दाखल झाले आहेत.    

संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची शुगर लेव्हल तसंच ब्लड प्रेशर नाॅर्मल असून त्यांच्यावर तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली.

राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती असून त्यांच्याकडे असलेली जबाबदारी एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.



हेही वाचा-

छातीत दुखू लागल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा