आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला


आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला
SHARES

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  आदित्य यांच्या निमित्तानं ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या 'रोड शो'साठी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.


जोरदार शक्तीप्रदर्शन

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे दाखल झाले असून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वरळी परिसरात वाजत-गाजत आदित्य ठाकरे यांच स्वागत करण्यात आलं.


ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. त्यामुळं शिवसेनेसह युवासेनेच्या कार्यकरत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतं आहे.हेही वाचा -

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेतसंबंधित विषय