निकालाआधीच 'या' कारणावरून भाजपा-शिवसेनेत मतभेद

विधानसभा निवडणूक निकालाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली आहे. नेमकं याचं काय कारण आहे वाचा...

SHARE

'आदित्य ठाकरे हे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका चॅनलच्या मुलाखतीत दिली. आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली आहे. आम्हाला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असं संजय राऊत म्हणाले. याशिवाय भाजप आमच्याशिवाय सरकार आणू शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं

सगळ्यांचं लक्ष असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी २००९ मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल.हेही वाचा

Assembly Elections Live : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात, कोण मारणार बाजी?

माहिम मतदार संघात कोण मारणार बाजी?संबंधित विषय
ताज्या बातम्या