Advertisement

मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवण्याची सरकारमध्ये हिंमत नाही- चंद्रकांत पाटील

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत नाही

मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवण्याची सरकारमध्ये हिंमत नाही- चंद्रकांत पाटील
SHARES

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला दिलेल्या सर्व योजना आज स्थगित वा प्रलंबित आहेत. यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विधिमंडळाचं २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची हिंमत नाही, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर विधीमंडळाचं २ दिवसीय अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शिवाजी चौक, कोल्हापूर इथं सकल मराठा समाजाद्वारे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात चंद्रकांत पाटील आणि भाजप (bjp) पदाधिकारी काळ्या फिती लावून सहभागी झाले होते.  

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षीय ओळखीशिवाय सहभागी होईल, असं मी वारंवार घोषित केलं होतं. त्याअंतर्गत सकल मराठा समाजाद्वारे आयोजित आंदोलनात प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे.

हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी महाराष्ट्राऐवजी दिल्लीत फिरावं- जयंत पाटील

आरक्षण असताना नोकऱ्या मिळालेल्या मराठा समाजातील तरुणांची प्रलंबित अपॉइंटमेंट लेटर्स महाविकास आघाडी सरकारने आजच द्यावीत. रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. राज्य मागास आयोगाची स्थापना करावी. 'जे ओबीसींना तेच मराठा समाजाला' अंतर्गत सर्व योजना द्याव्या. या मराठा समाजाच्या मागण्या आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला दिलेल्या सर्व योजना आज स्थगित आहेत, प्रलंबित आहेत. यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विधिमंडळाचं २ दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची हिंमत नाही. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात सर्वसामान्य नागरिक म्हणूनच सहभागी होणार, असंही चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केलं. 

(maharashtra bjp president chandrakant patil participate in maratha reservation rally)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा