Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

तोपर्यंत मनसेशी युती नाही, भाजपचा पुन्हा खुलासा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खुलासा करताना मनसेसोबतच्या युतीची अट स्पष्टपणे सांगितली आहे.

तोपर्यंत मनसेशी युती नाही, भाजपचा पुन्हा खुलासा
SHARES

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करणार का? असा प्रश्न सातत्याने भाजप (bjp) नेत्यांना विचारला जात आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खुलासा करतानाच मनसेसोबतच्या युतीबाबतची अटच स्पष्टपणे सांगितली आहे.

भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं, तेव्हापासून दोन्ही पक्षांत कमालिचं राजकीय वैर निर्माण झालं आहे. 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाल्यानंतर येऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांही एकत्रित लढण्यावर तिन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पूर्णपणे एकटा पडला आहे. त्यातच मनसेने हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेतल्याने समान विचारधारेच्या आधारे भाजप-मनसे (mns) सोबत युती करणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

हेही वाचा- पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

असाच प्रश्न एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत मनसे परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करत नाही; तोपर्यंत त्याच्यासोबत युतीवर चर्चा होणार नाही, असं पाटील म्हणाले. 

याआधी देखील एकवेळ महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा किती प्रभाव असेल, याचा अंदाज घेता येऊ शकतो. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा किती प्रभाव असेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मनसेशी युती करणार नाही, हे स्पष्ट आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमची भूमिका व्यापक आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरीता असलेली भूमिका आम्हाला मान्य असली, तरी मराठी माणसांच्या हक्काकरीता लढताना अमराठी माणसाला वाळीत टाकणं आम्हाला मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले होते.  

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीत आपले उमदेवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणवेत, असे निर्देश राज ठाकरे (raj thackeray) यांनी तमाम मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

(maharashtra bjp president chandrakant patil say no to alliance with mns)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा