Advertisement

महापालिकेने गाळाऐवजी सर्वसामान्यांच्या करातून माल काढला- केशव उपाध्ये

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला. पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला.

महापालिकेने गाळाऐवजी सर्वसामान्यांच्या करातून माल काढला- केशव उपाध्ये
SHARES

पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्याने भाजपकडून (bjp) मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्यांच्या खिशातून फक्त पैसे काढण्याचं काम केल्याचा आरोप महापालिकेवर केला आहे.

पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महापालिकेकडून (bmc) मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. नालेफसफाई, गटारांची स्वच्छता, डागडुजी, पाणी साचण्याच्या ठिकाणांवर पाणी उपसा करणारे पंप बसवणे इ. विविध कामे महापालिकेकडून करण्यात येतात. यंदा तर सायन सर्कल, हिंदमाता अशा ठिकाणी भूमिगत विहिरी बनवण्याचं कामही महापालिकेकडून करण्यात आलं. शिवाय नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावाही महापालिकेकडून करण्यात आला. असं असूनही मुसळधार पावसात (mumbai rains) मुंबईची तुंबई झालीच. 

हेही वाचा- “आता ठाकरे सरकार पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल”

त्यावर केशव उपाध्ये म्हणाले, पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला. पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला, पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर टीका केली.

तर दुसरीकडे मुंबई महापालिका आयुक्तांनी जर आम्हाला विचारलं, तर आम्ही त्यांना एवढंच सांगू की भ्रष्टाचार कमी करून आता तरी मुंबईतील नालेसफाई नीट करा. ज्या ठिकाणी पाणी साचतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा, अशीच आमची त्यांच्याकडे मागणी राहील.

पहिल्याच पावसात पाण्याखाली गेलेल्या हिंदमाता परिसराची पाहणी केली. पंप लावले, पूल बांधले तरीही हिंदमाता परिसरात पाणी तुंबलेच. पूर्वीप्रमाणेच आजुबाजूच्या इमारतींना पाण्याचा वेढा आहे. महापालिका कोट्यवधी रुपये मोजून काय कंत्राटदारांचे खिसे गरम करण्यासाठी कामं काढते? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

(maharashtra bjp spokesperson keshav upadhye comment on mumbai rains and corruption in bmc)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा