Advertisement

मनसे विरुद्ध भाजप, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर भाजपची टीका

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावरील तोडफोडीच्या प्रकरणावरून भाजपचा अमित ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

मनसे विरुद्ध भाजप, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर भाजपची टीका
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत. अमित ठाकरे यांनी नाशिकमधील टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर काही मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्लाझाची तोडफोड केल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले. याप्रकरणी ८ जणांना ताब्यातही घेण्यात आले. 

अमित ठाकरे यांना शनिवारी रात्री ९.१५ वाजता मुंबईला जात असताना सिन्नर येथील गोंडे टोल प्लाझा येथे त्यांच्या वाहनाच्या फास्टॅग तपशीलात काही तफावत आढळल्याने त्यांना थांबवण्यात आले. यावेळी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांच्या जमावाने प्लाझाची तोडफोड केली. 

या घटनेवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, "मी शिर्डीला भेट देण्यासाठी आलो होतो, माझ्या वाहनात FASTag लावण्यात आला होता, पण मला टोलनाक्यावर थांबवण्यात आले, मला थांबवण्याचे कारण विचारले असता, टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, याबाबत मी मॅनेजरशी बोललो, त्यानेही माझ्यासोबत गैरवर्तन केले."


महाराष्ट्र भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये पक्षाने अमित ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा घटना खपवून घेणार नाहीत, असे पक्षाचे म्हणणे आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.

याला मनसेकडूनहीउत्तर देण्यात आले आहे. मनसे अधिकृत या त्यांच्या फेसबुक पेजवरून भाजपवर टीका करण्यात आली आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय.

आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत.

हेही वाचा

समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

अजित पवार होणार मुख्यमंत्री? महत्त्वाची माहिती समोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा