Advertisement

Maharashtra Budget 2020: घर खरेदीदारांसाठी खूशखबर, स्टँप ड्युटीत १ टक्के सवलत

घर खरेदीला (home buyers) प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने (maha vikas aghadi) पुढील २ वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात (stamp duty) १ टक्के सवलत जाहीर केली आहे.

Maharashtra Budget 2020: घर खरेदीदारांसाठी खूशखबर, स्टँप ड्युटीत १ टक्के सवलत
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील घर खरेदीदारांसाठी मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 

घर खरेदीला (home buyers) प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने (maha vikas aghadi) पुढील २ वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात (stamp duty) १ टक्के सवलत जाहीर केली आहे. मुद्रांक शुल्क कपातीने मालमत्ता क्षेत्रातील मरगळ दूर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- Maharashtra Budget 2020: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य

गरज असूनही ग्राहक घर (home buyers) खरेदीसाठी बाहेर येत नसल्याने मालमत्ता क्षेत्राला मागील काही वर्षांपासून मरगळ आली आहे. घरांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किंमती, महागडं कर्ज आणि नोकरी-वेतनावरील टांगलेली तलवार ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. नोटबंदी, जीएसटीचा परिणाम देखील बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. घर खरेदी ठप्प झाल्याचा मोठा परिणाम मालमत्ता बाजारपेठेवर झाला आहे. मुंबईत सद्यस्थितीत १ लाख ५६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये बांधकाम व्यावसायिकांचे पैसे अडकले आहेत. 

या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी पुढील २ वर्षांसाठी मुद्रांक शुल्कावर १ टक्का सवलत जाहीर केली आहे.ही सवलत मुंबई महानगर प्रदेश (MMR) , पिंपरी चिंचवड आणि नागपूर या विभागातील ग्राहकांसाठी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांची (affordable housing) मोठी गरज आहे. मुंबई भोवतालच्या परिसरात ५ लाख नवीन घरं बांधता येऊ शकतात. ही घरे परवडणारी असल्यास सर्वसामान्यांची घरांची गरज भागण्यासोबतच बांधकाम क्षेत्रातील मंदीही दूर होऊ शकते. त्यासाठी राज्य शासनातर्फे १ मे २०२० पर्यंत ३० हजार घरे बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत दिली होती. 

हेही वाचा- Maharashtra Budget 2020: स्वस्त घरे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना दिलासा आणि बरंच काही…


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा