Advertisement

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक आक्रमक

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक आक्रमक
SHARES

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) आजपासून सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यानं दोन वर्षांनंतर तीन आठवड्यांचे अधिवेशन होत आहे. या आधीच्या अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशनही वादळीच ठरण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे मध्यवर्ती सभागृहात अभिभाषण होईल.

सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी वादात आहेत. त्यांना महाविकास आघीडीच्या आमदारांकडून टीकात्मक घोषणाबाजीचा सामना करावा लागू शकतो.

त्याचबरोबर काँग्रेस पक्ष सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरुद्ध निंदा प्रस्ताव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला उत्तर म्हणून विरोधकही राज्य सरकारला घेरण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करण्यापासून ते दोन्ही सभागृहात आक्रमक विरोध करण्यासाठी सज्ज असतील.

तर विरोधकही आक्रमक भूमिकेत असणार आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना झालेल्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. यासोबतच शेतकऱ्यांची वीज तोडणी, कर्जमाफी, वाईन विक्रीचा निर्णय यावरूनही विरोधक आक्रमक पवित्रा घेणार आहेत.

आज राज्य एस टी महामंडळाचा विलनिकरण संदर्भातला अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. ज्याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या अर्धसंकल्प अधिवेशनाच्या सुरवातीलाच विधान सभा अध्यक्ष निवडणुकही होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी या अधिवेशनातही चांगले कामकाज होईल, असा विश्वास व्यक्त केला.



हेही वाचा

खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच... - संजय राऊत

२०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार - आदित्य ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा