Advertisement

खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच... - संजय राऊत

ईडीच्या (ed) कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे.

खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच... - संजय राऊत
SHARES

ईडीच्या (ed) कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. 'खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे' असं सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

'खेळ नुकताच सुरू झाला आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय एजन्सीजच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी 'वसुली एजंट्स' मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले' अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

' जे काही पुरावे दिले आहे. अधिक तपशील शेअर करण्‍यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे' असं संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत आता काय खुलासा करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मध्यंतरी नवाब मलिक यांना अटक झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बॅकफुटवर गेले होते. आता पुन्हा एकदा संजय राऊत मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, आज आणखी एका महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर ईडीनं कारवाई केली आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना (Ram Ganesh Gadkari Sugar Factory) व्यवहार प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची ईडीने १३ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास प्राजक्त तनपुरेंची १० तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने कारवाई करत प्राजक्त तनपुरे यांची १३ कोटी ४१ लाखांची संपत्ती जप्त केली आहे.



हेही वाचा

२०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार - आदित्य ठाकरे

मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजेंनी आमरण उपोषण सोडलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा