मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा पारदर्शकतेचाच अजेंडा

 Mumbai
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा पारदर्शकतेचाच अजेंडा

मलबार हिल - अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सह्याद्री शासकीयगृहात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्येही शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा पारदर्शकता या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकार, लोकायुक्त, विरोधी पक्ष नेते यांना हजर राहता यावे अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलोकायुक्त आणि महापालिकेतील पारदर्शक कारभारासाठी समिती गठीत केली आहे अशी घोषणा केली होती. त्यावरही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला की, समिती सर्व महापालिका, जिल्हापरिषदेमधील पारदर्शकतेसाठी अभ्यास करणार आहे.

Loading Comments