Advertisement

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भुमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादर येथील महापौर निवास येथे स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामासाठी १०० कोटींचा निधी देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भुमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे
SHARES

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादर येथील महापौर निवास येथे स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामासाठी १०० कोटींचा निधी देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. स्मारकातील आर्थिक अडचण दूर झाल्यानं आता स्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून बुधवारी २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी स्मारकाचं भुमिपुजन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्मारकाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)वर टाकण्यात आली आहे.


महापौर बंगल्यात स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा झाली. पण अजूनपर्यंत स्मारकाचं काम मार्गी लागलेलं नाही. स्मारकासाठी जागेचा शोध काही वर्षे सुरू होता आणि दादर, महापौर निवासाच्या रूपानं जागेचा शोध थांबला. महापौर निवासात स्मारक बांधण्याचा निर्णय घेत त्यानुसार महापौरांचं तात्पुरत राणी बागेतल्या बंगल्यात हलवण्यात आलं आहे. २३ जानेवारीला, बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनी स्मारकाचं भुमिपुजन करण्याचा शिवसेनेचा मानस होता. त्यानुसार नुकतचं महापौर निवास रिकामं करण्यात आलं आहे. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राणीच्या बागेतील बंगल्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता स्मारकाच्या कामाला सुरूवात करण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.


१०० कोटींचा निधी मंजुर

अशातच मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या कामासाठी १०० कोटींचा निधी मंजुर केला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकण्यात आली आहे. तेव्हा हा प्रकल्प आता एमएमआरडीएच्या माध्यमातून मार्गा लावण्यात येणार आहे. या स्मारकासाठीचा १०० कोटींचा खर्च एमएमआरडीए करणार असून त्यानंतर खर्चाची रक्कम एमएमआरडीएला सरकारकडून दिली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.


मोदींच्या उपस्थितीत भूमिपूजन

दरम्यान २३ जानेवारीला, बुधवारी स्मारकाचं भुमिपुजन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या भुमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. स्मारकाच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने मोदी आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं युती होणार का याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



हेही वाचा -

'विराट' कामगिरी, कोहलीची आयसीसी पुरस्कारांची हॅट्रिक

इम्तियाज जलिल यांचा यु टर्न, मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा