Advertisement

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार : देवेंद्र फडणवीस

जनतेनं महाराष्ट्रात भाजपला दिलेल्या पाठिंब्याचे देवेंद्र यांनी आभार मानले. तसंच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार : देवेंद्र फडणवीस
SHARES

विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार अशी अपेक्षा शिवसेना-भाजपाला आहे. असं असलं तरी भाजपा २०१४ सारखे यश मिळवण्यात अपयशी ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  भाजपाला मिळालेल्या जागा पाहता शिवसेनेची मदत घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. याच पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

"मुख्यमंत्री महायुतीचाच"

जनतेनं महाराष्ट्रात भाजपला दिलेल्या पाठिंब्याचे देवेंद्र यांनी आभार मानले. तसंच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जे ठरलं त्यानुसारच पुढे जाऊ. आताच मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर काहीही उत्तर देणार नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही. विरोधी पक्षांनी जास्त हुरळून जाऊ नये. त्यांना फार काही करता आलं नाही. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकली आहे, आमचं सर्व काही सुरळीत होईल असंही ते म्हणाले. युती म्हणून लढलो आणि आमची तीच भावना कायम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"बंडखोरांचा पाठिंबा"

बंडखोरीमुळे भाजपला फटका बसला असल्याचं त्यांनी मान्य केलं. जे बंडखोर निवडून आले त्यातल्या अनेकांशी माझं बोलणं झालं असून किमान १५ लोकांनी मला पाठिंबा देण्याचं मान्य केलं, असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. याशिवाय आमचे काही मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले याचा विचार करू. उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा

आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले - उद्धव ठाकरे

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा