आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले - उद्धव ठाकरे

उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदावर अडीच-अडीच वर्ष दावा सांगितला आहे. आपल्याला सत्तास्थापनेची कोणतीच घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.

SHARE

लोकसभा निवडणुकीवेळी  ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपाची अडचण मी समजून घेतली. पण प्रत्येकवेळी मी अडचण समजून घेणार नाही. मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदावर अडीच-अडीच वर्ष दावा सांगितला आहे. आपल्याला सत्तास्थापनेची कोणतीच घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. यावेळी उद्धव म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समान वाटा देण्याचं ठरलं होतं. याची आता अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात समजून घेतलं. पण सत्ता वाटपात समजून घेणार नाही. मला सत्तेची हाव नसून सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्विकारणार नाही, असं म्हणत उद्धव यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तेची ऑफरही धुडकावून लावली. 

महाराष्ट्रातील जनतेनं दडपणाला बळी न पडता चांगलं मतदान केलं. त्यामुळे महायुतीला सरकार स्थापन करता येईल एवढ्या जागा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे आभारच मानतो असं उद्धव म्हणाले. या जनादेशामुळे सर्वांचेच डोळे उघडले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हाच निकाल अपेक्षित असून मतदारांनी लोकशाही जीवंत ठेवली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.हेही वाचा -

मुंबईतील 'हे' आहेत विजयी उमेदवार

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार
संबंधित विषय
ताज्या बातम्या