Advertisement

म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलो, उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा

कोरोना हे आपल्या देशावर आलेलं विचित्र संकट आहे. वादळ येऊ द्या चक्रीवादळ येऊ द्या किंवा कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कशाचीही भीती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलो, उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा
SHARES

कोरोना हे आपल्या देशावर आलेलं विचित्र संकट आहे. वादळ येऊ द्या चक्रीवादळ येऊ द्या किंवा कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कशाचीही भीती नाही. कारण शिवसेना हेच एक वादळ आहे, त्यामुळं आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात शिवसैनिकांना प्रोत्साहन दिलंं. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार १९ जून रोजी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

म्हणून मुख्यमंत्रीपदावर

भाजपसोबतचा वाद आणि मिळालेलं मुख्यमंत्रीपद यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो मोडीत काढण्यासाठीच मी आज इथं मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनाप्रमुखांची हीच परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणं ही आमची कमजोरी नाही, तर आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा  लाचार होणारा नाही. 

हेही वाचा - आता अनलाॅकिंगवर बोलूया, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले मुद्दे

विचारधारा बदलली नाही

शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरेच्या दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलं.

शिवसैनिक हेच कवच

शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचकसुद्धा आहे. कोरोनाचं संकट, चक्रीवादळाच्या तडाख्यातसुद्धा शिवसैनिक जीवाची पर्वा न करता मदत करत आहे. कस्तुरबा आणि पुणे इथं फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण १०० लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनतील.  डॉक्टरांना मास्क, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज अशा सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. वादळ, चक्रीवादळ किंवा कोणतंही संकट येऊ दे तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे, तोपर्यंत मला कशाचीही भीती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 हेही वाचा - ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, नारायण राणेंचा सरकारवर निशाणा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा