Advertisement

‘जिंदगी, जान उसके बाद काम’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

‘जिंदगी, जान उसके बाद काम’
SHARES

‘हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावं लागेल, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वर्षा या शासकीय निवासस्थानातून मराठी नाट्य निर्माता संघ तसंच राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

भीती गेली बेफिकीरी वाढली  

यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं की, आता कुणाला जबाबदार धरणं, योग्य नाही. आता परिस्थितीत स्वीकारायलाच हवी. आता दोष कुणाचा हे शोधण्याची वेळ नाही. स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. राज्यात २५-२५ कोटी लसींची मात्रा आवश्यक आहे. ती येईपर्यंत आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल. नुकसान तर पूर्ण राज्याचं होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ काम याप्रमाणे पुढं जावं लागेल. लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगलं झालं. पण त्यामुळे बेफिकीरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले, गेल्या वर्षभरात नाट्यक्षेत्रासह, चित्रपटसृष्टी आणि थिएटर्स चालकांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. हे मान्य आहे. संक्रमण रोखण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करत आहोत. तुम्ही नियमही पाळत आहात. पण स्वयंशिस्त कमी पडत आहे. आपण टेलिआयसीयू सारख्या नवतंत्रज्ञानचा वापर करत असूनही विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. घराघरात रुग्ण वाढत आहेत. कुटुंबं बाधित होत आहेत. त्यामध्ये अत्यवस्थ होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तुम्ही मनोरंजनातून जनजागृती करत आहात. त्यामुळे तुम्हालाही या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे यावं लागेल. त्यासाठी सहकार्य कराल, ही अपेक्षा आहे.

हेही वाचा- होम क्वारंटाईनसाठी बीएमसीची नवी नियमावली

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट व्यवसायाशी निगडीत लोकांची निर्बंधाने अडचण होणार आहे. परंतु रुग्णसंख्येतील वाढ पाहता नाईलाजाने काही निर्बंध लावावे लागणार आहेत. निर्बंध लावताना मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल,असंही त्यांनी सांगितलं.

थिएटर्स चालक-मालकांचे सहकार्य

नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी खुर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल.

कमल गियानचंदानी म्हणाले, शासनाला पूर्ण सहकार्य करू. जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबाच राहील.

रोहित शेट्टी म्हणाले, सरकार जो निर्णय घेईल, त्याच्या सोबत राहू. आपल्या प्रेक्षकांनाही त्रास होतो आहे. एकजुटीने शासनासोबत राहू. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेळी परिस्थितीचे पुनरावलोकनही केलं जावं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा