Advertisement

‘त्यांची’ तर रेल्वेगाडी, मुख्यमंत्र्यांचा एनडीएला टोला

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार जर तीनचाकी रिक्षा असेल, तर एनडीए अर्थात भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार ही रेल्वेगाडी असल्याचा टोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘त्यांची’ तर रेल्वेगाडी, मुख्यमंत्र्यांचा एनडीएला टोला
SHARES

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार जर तीनचाकी रिक्षा असेल, तर एनडीए अर्थात भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार ही रेल्वेगाडी असल्याचा टोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. (maharashtra cm uddhav thackeray replies on bjp criticism on maha vikas aghadi government alliance saamana interview)

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं तीन चाकांचं सरकार असल्याची टीका सातत्याने विरोधाकांकडून होत असते, यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. 

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भलेही विरोधकांकडून सरकारला तीनचाकी रिक्षा असं उपरोधाने म्हटलं जात असलं, तरी ही तिन्ही चाकं एका दिशेने चालत असल्याचं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा असा प्रश्न मला विचारलात तर मी रिक्षाच सांगेन. कारण आपलं सरकार हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे. त्यामुळे माझा पाठिंबा हा रिक्षालाच असेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवता येणार नाही- मुख्यमंत्री

मागे एकदा मी एनडीएच्या बैठकीत गेलो होतो तेव्हा तिथं ३० ते ३५ घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाय विविध राज्यांमध्ये त्यांना अपक्षांचीही आहेच. याचाच अर्थ आपलं सरकार जर तीन चाकी रिक्षा असेल तर एनडीए ही तर रेल्वे गाडी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला.

राज्यात दोन मुख्यमंत्री असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून आहेत, तर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. असं, पाटील म्हणाले होते. त्याला प्रतिसवाल करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे फिरत आहेत ते तरी पाटील यांनी दाखवावं?, असं आव्हान दिलं. राज्यात ११ कोटी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येकाला वाटतं की मीच मुख्यमंत्री झालोय. उद्या पाटील यांनाही तेच मुख्यमंत्री झाल्याचं वाटू शकतं. वाटलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. त्यांना तसं वाटेत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा