Advertisement

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
SHARES

मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) लवकरच प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसं झाल्यास नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हायकमांडने हालचाली सुरू केल्याचंही म्हटलं जात आहे.

सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रीपद आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. तर त्याआधीपासून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी धुरा देखील सांभाळत आहेत. राज्यातील काँग्रेसला पुन्हा पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावा, जेणेकरून मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, पक्ष नव्या जोमात कामाला लागेल, अशी अपेक्षा पक्षातून व्यक्त होत आहे. त्यामुळे हायकमांडकडून आदेश येण्याआधीच स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात सध्या दिल्लीत असल्याने काँग्रेसचे पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने (congress) मागील विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या, तर राज्यातील महाविकास आघाडीत सामील होण्यात त्यांची भूमिका निर्णायक होती. थोरात यांनी जरी राजीनामा दिला तरी, हायकमांड त्यांना या जबाबदारीतून मुक्त करणार का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा- भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार- बाळासाहेब थोरात

काही दिवसांपूर्वीच हायकमांडने मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केली होती. त्यानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक (bmc election) स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केली आहे. याच पद्धतीने राज्यातील काँग्रेस संघटनेत बदल झाल्यास ग्रामपंचायत निवडणुकीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा मिळू शकेल, असं म्हटलं जात आहे. त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्णवेळ पक्षकार्याकडे लक्ष देणारा नेता हवा, अशी मागणी काँग्रेसमधील नेत्यांकडून केली जात आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मात्र पटोले यांच्यासोबतच नितीन राऊत, यशोमती ठाकूर आणि अमित देशमुख यांची नावंही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं म्हटलं जात आहे.

(maharashtra congress president balasaheb thorat might resign from post)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा