Advertisement

“टिव टिव करणाऱ्या अभिनेत्यांना बोललो, तर भाजपला मिरच्या का झोंबल्या”

नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींवर टिव टिव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का? ही जनतेच्या मनातली भावना बोलून दाखवली तर भाजप नेत्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय ?

“टिव टिव करणाऱ्या अभिनेत्यांना बोललो, तर भाजपला मिरच्या का झोंबल्या”
SHARES

नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींवर टिव टिव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का? ही जनतेच्या मनातली भावना बोलून दाखवली तर भाजप नेत्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय ? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.

नाना पटोले यांनी फडणवीस यांना उत्तर देताना म्हटलं आहे की, “सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ” याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचं वक्तव्य फारसं मनावर घेण्याचं कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढीसंदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. 

इंधन दरवाढीवरून अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्यावर नाना पटोले यांनी निशाणा साधल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली हाेती. अलिकडच्या काळामध्ये प्रसिद्धीकरीता अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. कारण त्यांना माहीत आहे की, अभिनेत्यांबद्दल एखादं वक्तव्य केलं, तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते. काही लोकांचं बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, असंही आहे. याप्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललंय. त्यामुळे याला फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. असं कुणीही शुटिंग बंद करू शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत नाही- अजित पवार

तर, जेव्हा केंद्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकशाहीच्या मार्गावर चालणारं यूपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल ७० रुपये प्रति लिटरवर गेल्यावर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.

आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. अश स्थितीत हे गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

यूपीए सरकारच्या काळात ते ज्या प्रकारे ट्विट करून भूमिका मांडत होते. तशी भूमिका त्यांनी मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या बाबतीतही मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू, असा इशारा देखील दिला होता.

(maharashtra congress president nana patole replies devendra fadnavis on fuel price hike)

हेही वाचा- इंधन दरवाढीवर अमिताभ, अक्षयची टिवटिव बंद का? भूमिका न घेतल्यास...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा