Advertisement

“फडणवीसांच्या पुतण्याला लस, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का?”

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“फडणवीसांच्या पुतण्याला लस, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का?”
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रोकठोक सवाल उपस्थित केला आहे. 

तन्मय फडणवीस याने नागपूरमधील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ इथं कोरोनावरील लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. परंतु त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाल्याने रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून हा ‘फोटो’ हटविण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेकांनी या फोटोचे ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. 

हेही वाचा- मोठी बातमी! १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीय. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का ?, जर तसं नसेल, तर त्याला लस दिलीच कशी गेली? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र क्राँग्रेसच्या (congress) ट्विटरवरून उपस्थित करण्यात आला. 

या वादानंतर तन्मय फडणवीस यानं मुंबईतील (mumbai) सेव्हन हिल्स या रुग्णालयात कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानं कोणत्या निकषांनुसार हा डोस घेतला याची कल्पना नाही. त्यानं आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यावर आमच्या सेंटरमध्ये त्यांना दुसरा डोस देण्यात आला, असा खुलासा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी केला.

तन्मय फडणवीस हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, तो २५ वर्षांच्या आतील आहे. कोरोना लसीकरणाच्या सध्याच्या कार्यक्रमानुसार केवळ ४५ वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांनाच लस घेण्याची मुभा आहे. 

(maharashtra congress raised a question on tanmay fadnavis covid 19 vaccination)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा