Advertisement

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यू.पी. पोलिसांच्या ताब्यात

बांसच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंबंधीची माहिती राऊत यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यू.पी. पोलिसांच्या ताब्यात
SHARES

उत्तर प्रदेशातील आझमगडमधील बांस या गावात एका दलित सरपंचाची हत्या झाली आहे. या हत्येची माहिती घेण्याकरीता बांसच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंबंधीची माहिती राऊत यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. (maharashtra energy minister nitin raut detained by u p police)

बांस या गावात एका दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर तेथील परिस्थिती तणावग्रस्त झाली. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागला पाहिजे, अशी मागणी स्थानिक दलित समाजाकडून होऊ लागली. तसंच याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

या प्रकरणाची माहिती मिळताच ऊर्जामंत्री नितीन राऊत बांस गावाकडे निघाले. बनारस विमानतळावर उतरल्यानंतर आझमगड मार्गे बांस गावाच्या दिशेने राऊत निघाले असता आझमगड सीमेवर त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. आपल्याला बांस गाव इथं जायचं आहे, असं सांगितल्यावर या गावात जाण्यास कुणालाही परवानगी नाही असं पोलिसांनी त्यांना सांगितलं तसंच जवळच्या गेस्ट हाऊसवर येण्याची विनंती डॉ. राऊत यांना केली. 

परंतु आमचं कार्यकर्ते ज्या ठिकाणी थांबलेत तिथं तरी जाऊ द्यावं, अशी विनंती केली असता, पोलिसांनी ही विनंती फेटाळत राऊत यांना ताब्यात घेतलं आणि गेस्ट हाऊसवर नेण्यात आलं. तिथं थोडा वेळ थांबल्यानंर त्यांना पुन्हा सोडून देण्यात आलं. तिथून पुढं राऊत यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत निर्दशने केली. बनारस विमानतळावर उतरताच आपल्याला अटक होऊ शकते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.


हेही वाचा-

महावितरणला १० हजार कोटी द्या, नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

Electricity Bills: राज्यातील उद्योगांना वीज दरात सवलत- नितीन राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा