Advertisement

मुंबईवरील वीजसंकट: ऊर्जामंत्र्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

तुम्ही जबाबदारी निश्चित करा नाहीतर मी जबाबदारी निश्चित करून कारवाई करेन, अशा कडक शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

मुंबईवरील वीजसंकट: ऊर्जामंत्र्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
SHARES

गेल्या आठवड्यात संपूर्ण मुंबई महानगरातील वीज ठप्प होऊन मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. या वीज संकटाबाबतचा चौकशी अहवाल देण्यासाठी तुम्ही जबाबदारी निश्चित करा नाहीतर मी जबाबदारी निश्चित करून कारवाई करेन, अशा कडक शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्याच्या घटनेवर सखोल चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक उपस्थित होते.

यावेळी मुंबई आणि मुंबई महानगर (MMR) परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ.नितीन राऊत यांनी दिला. (maharashtra energy minister nitin raut orders departmental enquiry of power failure in mumbai and mmr)

हेही वाचा- मुंबईतील ‘या’ उपकेंद्रातून ४०० के.व्ही. वीज मिळणार

सन १९८१ पासून आयलँडिंग यंत्रणा लागू करण्यात आली. १९८१ च्या तुलनेत आज लोकसंख्या वाढली, तंत्रज्ञान बदललं आणि वीज निर्मितीही वाढली. या यंत्रणेत गेल्या ४० वर्षात काय बदल केले गेले? जगातील प्रमुख महानगरांमध्ये आयलँडिंग यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो? हा प्रश्न लगेच उद्भवू नये म्हणून आणि भविष्यात ३० वर्षांत उद्भवू नये यासाठी सखोल अभ्यास करुन परिपूर्ण योजना आखण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी दिले. मुंबईत भविष्यात असा वीज ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेचं नवं डिझाइन तयार करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

या सर्व अभ्यासाचा समावेश करुन अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे तसंच अशा घटनांसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही डॉ.राऊत यांनी दिले.

राज्यात वीज पारेषण क्षेत्रात एसएलडीसी (State Load Dispatching Centre) ची भूमिका महत्त्वाची आहे. या केंद्राने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का? याबाबत अन्य संबंधित यंत्रणांना पूर्वसूचना देण्यात आली होती का? यासारख्या बाबीही तपासाव्या लागतील.

वीज पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असल्याने एसएलडीसीने आयलँडिंग करण्याची पूर्वसूचना त्यांना दिली नाही, असा दावा टाटा कंपनीने केला आहे. तर त्यांना आधीच कळवल्याचं एसएलडीसी सांगत आहे. त्यामुळे नेमकं कोण खोटं बोलतंय हे तपासण्यासाठी ज्या अधिकाऱ्याने टाटाला एसएमएस पाठवून कळविलं त्याचा मोबाइल मी बघणार आहे. त्याने टाटाला नेमका किती वाजता एसएमएस पाठवला ह तपासणार असल्याचं, डॉ. राऊत यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement