Advertisement

राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं? भाजप आक्रमक

राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राज्यपालांना खासगी विमानाने देहरादून पर्यंतचा प्रवास करावा लागला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं? भाजप आक्रमक
SHARES

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील वादात आता नव्या प्रकरणाची भर पडली आहे. राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राज्यपालांना खासगी विमानाने देहरादून पर्यंतचा प्रवास करावा लागला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उत्तराखंडमध्ये निघाले होते. या प्रवासासाठी ते सरकारी विमानाचा वापर करणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाला परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आल्याने राज्यपालांना पुन्हा परतावं लागलं. त्यामुळे राज्यपाल आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी खासगी विमानानं उत्तराखंडला निघाले, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

या घटनेची माहिती होताच भाजपकडून (bjp) महाविकास आघाडी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करण्यात येत आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरायला लावून सरकारने त्यांचा अवमान केल्याचा आरोप भाजपकडून केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा- राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, राज्यपालांना कोणत्या कारणामुळे सरकारी विमानाने जाऊ दिलं नाही, त्याची माहिती घेण्यात येत आहे. त्यांना परवानगी नाकारण्याचं कारण काय? विमानात काही तांत्रिक अडथळा होता का?, एटीसीची प्रक्रिया पूर्ण झाली होती का?, या सगळ्यांची माहिती घेतली जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shaikh) यांनी स्पष्ट केलं. सोबतच राज्यपालांचा आम्ही सन्मानच करतो, त्यांचा अवमान होणार नाही, असंही शेख यांनी सांगितलं.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून सध्या राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये खडाजंगी सुरू आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांच्या नावाची यादी पाठवून देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सदस्यांची निवड न केल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भगत सिंह कोश्यारी विधान परिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या प्रश्नावरून राज्यपालांना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.

(maharashtra government denied permission to governor bhagat singh koshyari to fly in government plane)

हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा