Advertisement

'हे' आहेत पुन्हा घरवापसी करणारे राष्ट्रवादीचे आमदार

शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा पक्षाकडे परतले आहेत. या आमदारांनी बंडखोरी करण्यास नकार दिला आहे.

'हे' आहेत पुन्हा घरवापसी करणारे राष्ट्रवादीचे आमदार
SHARES

राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा पक्षाकडे परतले आहेत. या आमदारांनी बंडखोरी करण्यास नकार दिला आहे.


कोण आहेत हे आमदार?

राष्ट्रवादीचे सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, पंकज जाधव, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, माणिकराव कोकाटे गे आमदार पुन्हा परतले आहेत. शिंगणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर या आमदारांनी उद्धव-पवार यांच्या पत्रकार परिषदेत घडलेला घटनाक्रम सांगितला.  .


शिंगणे, क्षीरसागर काय म्हणाले?

'आम्हाला काल रात्री अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी आम्हाला मुंबईत येण्यास सांगितलं आणि सकाळी राजभवानाकडे घेऊन गेले. मात्र आम्हाला शपथविधीची कोणतीही कल्पना दिली नव्हती. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही परत पवारसाहेंबाकडे आलो आहोत,


माणिकराव कोकाटे यांचीही वापसी

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे देखील परतले आहेत. त्यांनी ट्वीटरवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. 


मी शरद पवारांच्या सोबत : दिलीपराव बनकर

 


अजित दादांच्या सांगण्यावरून गेलो : पंकज जाधव


 


हेही वाचा

'अखेर करुन दाखवलंच!' अमृता फडणवीस यांचा ट्वीटरहून सेनेला टोला 

'अशा'प्रकारे बंडखोेरी करणाऱ्यांना पक्षांतरबंदी कायद्याचा फटका बसेल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा