Advertisement

पवारांची होर्डिंग्ज ‘दादांच्या समर्थकांनी बारामतीतून हटवली

बारामती हा शरद पवारांचा गड मानला जातो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी बारामतीमधल्या विकासकार्याच्या माध्यमातून स्वतःचं दबदबा निर्माण केला आहे.

पवारांची होर्डिंग्ज ‘दादांच्या समर्थकांनी बारामतीतून हटवली
SHARES

सत्तास्थापनेच्या घोषणेसाठी अवघे काही तास उरले असताना. अजित पवारांच्या भाजपसोबत गेल्याच्या निर्णयामुळे शनिवारी राजकिय घडामोडींना वेग आला. अजित पवारांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना. पुण्यासह बारामतीत पवारांना पाठिंबा देणारे पोस्टर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उतरवले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज धक्कादायक वळण मिळाले. राज्यभरात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सत्तास्थापनेसाठी नवीन समीकरण जुळून येत असतानाच सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने या नाट्यात आणखी भर पडली. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका पुतण्यामधील राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अजित पवारांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तर अनेक कार्यकर्त्यांनी पुण्यासह बारामतीत शरद पवारांच्या समर्थनार्थ चौकात ‘आम्ही, ८० वर्षाच्या योद्ध्यासोबत’  अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत पाठिंबा दर्शवला.

मात्र अवघ्या काही तासांमध्ये बारामतीतलं हे पोस्टर आता हटवण्यात आलेलं आहे. बारामती हा शरद पवारांचा गड मानला जातो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी बारामतीमधल्या विकासकार्याच्या माध्यमातून स्वतःचं दबदबा निर्माण केला आहे. मात्र त्याच शहरात आता शरद पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले पोस्टर्स उतरवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान पवार घराण्यात कोणताही वाद नको, यासाठी हे पोस्टर हटवण्यात आल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलं. मात्र यावेळी स्थानिक उपस्थित नागरिकांनी अजित पवारांना आपला पाठींबा दर्शवला.

या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याच्या कालावधी दिला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांचा राजकिय प्रवास

 १९९१ साली सर्वात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना शरद पवारांनी केंद्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना राजीव गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्यावर सोपवली होती. राजकारणातील ज्येष्ठता संपुष्टात येऊन काँग्रेसचे धोतर इतिहासजमा करून सुटाबुटातले चेहरे राजीव गांधींनी आणले होते. त्यातील एक तरुण, पण मराठी रांगडा चेहरा अजित पवार. शरद पवारांची महाराष्ट्रावर पकड असल्यामुळे शरद पवारांच्या नावावरच लोकसभेवर निवडून आलेले अजित पवार अर्थातच कायम शरद पवारांच्या पावलावरून चालू लागले. नंतर शरद पवार जेव्हा नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून गेले तेव्हा त्यांनी अजित पवारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेवर गेले आणि त्यानंतर अजित पवार  १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा