Advertisement

‘म्युकरमायकोसीस’च्या सर्व रुग्णांना मोफत इंजेक्शन द्या- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारं इंजेक्शन मोफत दिलं पाहिजे. शिवाय सरकारी किंवा खाजगी रूग्णालय असा भेद करू नये.

‘म्युकरमायकोसीस’च्या सर्व रुग्णांना मोफत इंजेक्शन द्या- देवेंद्र फडणवीस
SHARES

‘म्युकरमायकोसीस’ आजारावरील उपचारांचा खर्च प्रचंड आहे. राज्य सरकारची मोफत उपचारांची घोषणा फसवी आहे. राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारं इंजेक्शन मोफत दिलं पाहिजे. शिवाय सरकारी किंवा खाजगी रूग्णालय असा भेद करू नये. खाजगी रूग्णालयातील उपचारांचे दर सुद्धा निश्चित व्हावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘म्युकरमायकोसीस’ आजारावरील उपचारांसाठी रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्याचा इलाज महाग आहे, त्यावरील इंजेक्शनही महाग आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसीस आजार झालेल्या रुग्णांवर आम्ही मोफत उपचार करणार आहोत, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु सरकारची ही घोषणा पूर्णपणे फसवी आहे.

हेही वाचा- लस खरेदीसाठी एक देश एक पॉलिसी ठरवा, नवाब मलिकांचं केंद्राला आवाहन

खर्च सरकारने करावा

कारण या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयातही दाखल आहेत. यावरील मोफत इलाज हा केवळ सरकारी रुग्णालये आणि काही नोटिफाईड हाॅस्पिटल्समध्ये होत आहे. बहुतांश हाॅस्पिटल्समध्ये तो होत नाही. त्यामुळे म्युकरमायकोसीसचे रुग्ण मग ते कुठल्याही रुग्णालयांत दाखल असोत, सर्वांना राज्य सरकारने मोफत इंजेक्शन दिली पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. सरकारने इंजेक्शन खरेदी करावीत. मग ते सरकारी रुग्णालय असोत किंवा खासगी हे न पाहता सगळा खर्च सरकारने केला पाहिजे. त्याचसोबत खासगी रुग्णालयातील उर्वरीत उपचाराची रक्कमही सरकारने ठरवली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खोटी आश्वासने नकोत

लोकं रुग्णाला वाचवण्यासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च करताहेत. आपली घरंदारं विकताहेत, तरी देखील मृत्यूमुखी पडताहेत. त्यामुळे खोटी आश्वासनं देणं योग्य नाही. मला कोरोनाच्या काळात राज्य सरकारवर बनवाबनवी करत असल्याचे शब्द वापरारचे नाहीत, परंतु राज्य सरकारने लोकाभिमुख काम करावं, अशी आमची अपेक्षा आहे, ‘म्युकरमायकोसीस’बाबत रूग्णांचा लवकर शोध हा अतिशय महत्त्वाचा विषय असून, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तातडीने उभारावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(maharashtra government must give free injection to all mucormycosis patients demands devendra fadnavis)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा