Advertisement

Raj Thackeray: मराठी मुलांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने धोरण आखावं- राज ठाकरे

मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने देखील धोरण आखायलाच हवं, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray: मराठी मुलांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने धोरण आखावं- राज ठाकरे
SHARES

लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. आता तिथं मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे. परंतु यासाठी राज्य सरकारने देखील धोरण आखायलाच हवं, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं. (maharashtra government must make a policy to give job to marathi youth says mns chief raj thackeray)

यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनमुळे सद्यस्थितीत देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार नक्की काय करणार आहे? याविषयी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. 

महाराष्ट्रात लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील कामगार त्यांच्या त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागांवर मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी पक्ष काम करत आहे. माझे प्रतिनिधी कंपन्यांशी बोलत आहेत. परंतु याही पुढं जाऊन राज्य सरकारने यासाठी धोरण आखायलाच हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 

हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे

राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीय, दिसला नाही. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे, पण त्याचा बाऊ खूप केला गेला. आणि मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये कुठून क्वारंटाईन होणार होते? लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. आता सगळं सुरळीत करावंच लागेल. कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.

कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या; पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी विरोधकांनाही चिमटा काढला.

हेही वाचा - Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलं ठाकरे सरकारबद्दल ‘हे’ भाकीत  


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा