Advertisement

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचं लवकरच विस्तारीकरण

दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचं सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचं लवकरच विस्तारीकरण
SHARES

मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचं विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. (maharashtra government will extend single window system for entertainment industry shooting permission)

दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचं सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- शाहरुख, सलमान, आमिर आणि अजयसह ३४ निर्माते ‘या’ मीडिया हाऊसेसविरोधात न्यायालयात

अमित देशमुख म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असतं. अशा वेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणं आवश्यक आहे. या योजनेच्या विस्तारीकरणामुळे अधिकाधिक चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ शकेल. येणाऱ्या काळात या योजनेचं विस्तारीकरण करताना पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विस्तारीकरण करण्याबाबतचा विचार करण्यात यावा, याठिकाणी ही योजना अंमलात आणली गेल्यावर उर्वरित महाराष्ट्रातही एक खिडकी योजना राबविण्यात येईल.

राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.त्यांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी चित्रीकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या ३० हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या ७ दिवसांच्या आत देण्यात येतात. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचं पालन करुन तसंच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा