Advertisement

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मोफत कोरोना लस- नवाब मलिक

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे अल्पसंख्यांक, कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मोफत कोरोना लस- नवाब मलिक
SHARES

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत कोरोना लशीवरून राजकारण रंगलेलं असताना महाराष्ट्रातील प्रत्येकाला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे अल्पसंख्यांक, कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दिली. (maharashtra government will give free covid vaccine to everyone says nawab malik)

मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधनाता नवाब मलिक यांनी कोरोनाच्या लशीवरून राजकारण करणाऱ्या भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशावर कोरोनाचं संकट निर्माण झालेलं आहे. ३१ डिसेंबर रोजी वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने हेल्थ इमर्जन्सी जाहीर केली होती. त्या काळात देशाच्या सर्व सीमा मग ते विमानतळ असतील, बोटी असतील किंवा रस्तेमार्ग असतील, सील करून परदेशातून येणाऱ्यांना मज्जाव केला असता, तर आता ही वेळ आपल्यावर आली नसती आणि लाॅकडाऊनचीही गरज नसती. त्यामुळे ८० लाखांवर लोकांना कोरोना झाला नसता तसंच १ लाख २० हजार लोकं मृत्यूमुखी देखील पडले नसते. ही सगळी परिस्थितीत पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणामुळे तयार झालेली आहे. ही पूर्णपणे त्यांची जबाबदारी आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचा - बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचं काय?- बाळासाहेब थोरात

पंतप्रधानांनी जाहीर केलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीसाठी लस देणार आहात की लोकांचा जीव वाचवण्यासाठी देणार आहात. संपूर्ण देशवासीयांना लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. जर ते तयार नसतील, तर महाराष्ट्र सरकार आपल्या नागरिकांना मोफत कोरोनाची लस देणार, असं आश्वासन नवाब मलिक यांनी दिली.

बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तेथील रहिवाशांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जाहिरनाम्यात दिलं आहे. यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात काय, तर जगात अजूनही कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही. त्यात आधीच कोरोनाने भयभीत असलेल्या जनतेला मोफत लस देण्याचं गाजर दाखवणं हा भाजपने ताळतंत्र सोडल्याचा पुरावा आहे. बिहारमधील रहिवाशांना मोफत कोरोना लस देणार, तर मग महाराष्ट्र आणि इतर राज्यांना लस कधी मिळणार? की त्यासाठीही सर्वसामान्यांना पैसे मोजावे लागणार? असे प्रश्न विचारत बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या बिहारसाठी मोफत कोरोना लशीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.

हेही वाचा - कांदा परवडत नसेल तर लसूण, मुळा खा, बच्चू कडूंचा सर्वसामान्यांना अजब सल्ला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement