Advertisement

तर डाॅक्टरांना ‘मेस्मा’ लावणार- हसन मुश्रीफ

खासगी डाॅक्टरांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढं न आल्यास नाईलाजाने ‘मेस्मा’ लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

तर डाॅक्टरांना ‘मेस्मा’ लावणार- हसन मुश्रीफ
SHARES

कोरोनाच्या संकट काळात सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. खासगी आरोग्य व्यवस्था किंवा डाॅक्टारांकडून दुर्दैवाने म्हणावी तशी मदत होताना दिसत नाहीय. खासगी डाॅक्टरांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढं न आल्यास नाईलाजाने ‘मेस्मा’ लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. (maharashtra government will implement mesma act on private doctors)

रुग्ण दवाखान्यात जाताक्षणीच उपचार सुरु व्हायलाच पाहिजेत. रुग्णाला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष व्हायला पाहिजे. परंतु खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर टाळाटाळ करत आहेत. डाॅक्टर रुग्णांना हात देखील लावत नाही, अशी स्थिती आहे. उपचारांसाठी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. खासगी रुग्णलयात जाणं केवळ पैसेवाल्यांनाच शक्य होत आहे.

हेही वाचा - बोरीवलीत १ हजारहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना सुविधा केंद्रात सरकारी फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता भासत आहे. एमबीबीएस गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा ६० हजार रुपये, तर एमडी गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा २ लाख रुपये देत असूनही डॉक्टर यायला तयार नाहीत. अशा स्थितीत डाॅक्टरांना ‘मेस्मा’ लावण्यावाचून पर्याय उरत नाही. या कायद्यामध्ये डॉक्टरांची नोंदणी रद्द करून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी वेळीच सावध व्हायला हवं, अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचं रुग्ण बरे होणाचं प्रमाण ७०.०९ टक्के  एवढं आहे. आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान झालं असून सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

 हेही वाचा - नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा