Advertisement

तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही- उदय सामंत

जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही- उदय सामंत
SHARES

केंद्र सरकारने सोमवारी मानक कार्यप्रणाली जारी करत अटी-शर्थींच्या आधारे १५ आॅक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा-काॅलेज केव्हा सुरू होणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (maharashtra government will not allowed to start college again until covid 19 situation not coming under control says uday samant)

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातील बैठकीनंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना उदय सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी सावंत यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या सुविधेनुसार आॅफलाइन आणि आॅनलाइन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचं आयोजन विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, याची विषेश दक्षता घेतली जाईल, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी चिंता करू नये. आॅफलाइन परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. परीक्षा आणि निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व विद्यापीठं कटिबद्ध आहेत.

हेही वाचा- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत

मात्र महाविद्यायलं सुरू करण्याची कुठल्याही प्रकारची घाई राज्य सरकारकडून करण्यात येणार नाही. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार अनेक पावलं उचलत आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्याच्या उद्देशाने महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. जोपर्यंत राज्यातील कोरोनाची परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत ही महाविद्यालयं बंदच ठेवण्यात येतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

सोबतच राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं.

हेही वाचा- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा