Advertisement

राज्यातील सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द!

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द!
SHARES

राज्यातील (maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी जाहीर केलं. 

११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठीच्या आरक्षण सोडती याआधीच झाल्याचे निदर्शनास आलं आहे. या झालेल्या सोडतीही आता रद्द करण्यात आल्या असून त्याही आता निवडणुकीनंतर नव्याने घेण्याबाबतचे आदेश १६ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

याबाबत हसन मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले की, सरपंचपदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणं, जातीचा दाखला अमान्य होणं तसंच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च नव्याने निवडणूक घेणं क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर या बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे.

हेही वाचा- वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणावर ‘इतका’ खर्च, पीडब्ल्यूडीने केला खुलासा

त्या जिल्ह्यात सदर प्रक्रिया रद्द करून नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान कार्यक्रम १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. निवडणूक निकालाची अधिसूचना २१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसंच सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आलं आहे.

देशातील तसेच राज्यातील कोविड-१९ (covid19) महामारीच्या पार्श्वभूमीवर माहे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली अशा ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील २९ सप्टेंबर, २०२० रोजीच्या सुधारणेन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच ११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. तथापी, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची उद्घोषणा होण्यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत काढलेली होती व अद्यापही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. हा सर्व सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आता निवडणुकीनंतर होईल.

(maharashtra gram panchayat sarpanch selection cancel from government)

हेही वाचा- पक्ष वाढवायचा असेल तर, चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा