Advertisement

गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, भाजपची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास नकार देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, भाजपची मागणी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास नकार देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. (maharashtra home minister anil deshmukh must resign demands bjp leader kirit somaiya in sushant singh rajput suicide case)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयने करावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी दरम्यान दिला. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले. यामुळे मुंबई पोलीस तोंडघशी पडली असून भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच ठाकरे सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरूवात केली आहे. 

यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात २ महिने एफआयआर नोंदवलेला नाही. त्यांना याचं उत्तर हे द्यावंच लागेल. शिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जबाबदारी स्वीकारुन ताबडतोब राजीनामा द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तर ठाकरे सरकारने धडा घ्यावा. यापुढे ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही. सुशांत सिंह च्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली होती.   

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तोंडघशी, तपास सीबीआयकडे

मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा पूर्ण विश्वास असून मुंबई पोलीस अत्यंत पारदर्शकपणे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तपास सीबीआयकडे देण्याची काहीही गरज नाही. या प्रकरणाचा छडा लावण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत, असं म्हणत अनिल देशमुख यांनी वारंवर मुंबई पोलिसांची या प्रकरणी पाठराखण केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं म्हटलं. मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारने त्यांना सहकार्य करावं. तसंच या प्रकरणाची केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासासाठी आम्हाला सहकार्य केलं गेलं नाही, आमच्या अधिकाऱ्याला कैद्याप्रमाणे वागवलं असल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता नि:पक्षपातीपणे तपास होईल, असं ते म्हणाले. 

हेही वाचा - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने-अनिल देशमुख

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा