Advertisement

आॅक्सिजन पुरवठा १५ दिवसांत सुरळीत करा, उद्योगमंत्र्यांचे कंपन्यांना निर्देश

आरोग्य विभागाचा ऑक्सिजन पुरवठा अविरत ठेवून उद्योगांना देखील मुबलक ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना सुभाष देसाई यांनी केल्या.

आॅक्सिजन पुरवठा १५ दिवसांत सुरळीत करा, उद्योगमंत्र्यांचे कंपन्यांना निर्देश
SHARES

राज्यातील कोरोनाची स्थिती हळुहळू सुधारत असून पुढील १५ दिवसांत उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. दरम्यान, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही, असंही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. (maharashtra industry minister subhash desai holds a meeting with oxygen suppliers during covid 19 pandemic)

सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन पुरवठादार व उद्योजक यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. यावेळी उद्योगांना जाणवणाऱ्या ऑक्सिजन टंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, गॅस असोशिएशनचे अध्यक्ष साकेट टिकू यांसह उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा - आॅक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

राज्य शासनाने महिनाभरापूर्वी कोविड रुग्णांसाठी ८० टक्के ऑक्सिजन राखीव ठेवण्याबाबत आदेश काढले. यामुळे उद्योगांना ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. असं असलं तरी महिनाभराच्या कालावधीत कोरोनाची स्थिती सुधारत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे उद्योगांनाही ऑक्सिजन सुरू राहण्यासाठी आढावा घेतला जाईल. आरोग्य विभागाचा ऑक्सिजन पुरवठा अविरत ठेवून उद्योगांना देखील मुबलक ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना सुभाष देसाई यांनी केल्या.

राज्यातील उद्योगांना ८७० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन उद्योगांना लागतो. राज्यात सध्या एक हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. नवीन उद्योगांतून पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आपली उत्पादन क्षमता १३०० मेट्रीक टन इतकी आहे. त्यामुळे उद्योगांनी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना सुभाष देसाई यांनी केली. दरम्यान, कोरोना रुग्णांची गरज जसजशी कमी होईल, तसतशी उद्योगांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल. मात्र, या क्षणी प्राधान्य रुग्ण उपचारांनाच देण्यात येत आहे. ते प्राधान्य कायम राहील, असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - मुंबईतल्या 'या' रुग्णालयातला आॅक्सिजनचा पुरवठा वाढवला


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा